आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताह इंदुरीकर महाराजांसह अनेक महाराजांचा कीर्तन सोहळा : लोहा कंधार मध्ये भक्तीरसांच्या धारा बरसणार.

 आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताह इंदुरीकर महाराजांसह अनेक महाराजांचा कीर्तन सोहळा :  लोहा कंधार मध्ये भक्तीरसांच्या धारा बरसणार.

---------------------------

लोहा प्रतिनीधी 

अंबादास पवार 

---------------------------

 नांदेड लोकसभेचे माजी खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आ  प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात कीर्तन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. सर्वत्र श्रावणधारा कोसळत असताना आता भाविक भक्तांवर संत विचारांच्या भक्तीधारा ओल्या चिंब करणार आहेत. भक्तीरसात राहून निघण्यासाठी भाविक भक्तांनी आणि आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दिनांक १ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तनाचा सोहळा कै. बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालय लोहा येथे आयोजित करण्यात आले आहे. संग्राम मोरे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे उद्घाटन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बाजार मैदान सोनखेड येथे सुनील मोरे यांच्या पुढाकारातून हरिभक्त पारायण विनोदाचार्य निवृत्ती महाराज बुलढाणेकर यांचा कीर्तनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम माळाकोळी तालुका लोहा येथे ना.ना. तिडके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला आहे. याच दिवशी दुपारी २ वाजता हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम शंकर माधवराव माली पाटील मारताळेकर उर्फ बाळू पाटील चेअरमन यांच्या पुढाकारातून मारताळा येथे आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आ. चिखलीकर यांच्या मूळ गावी चिखली येथे शंकरराव पवळे चिखलीकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला आहे. आयोजित करण्यात आलेल्या सर्वच कीर्तन सोहळ्याला भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.