विद्या मंदिर वाकरे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ पुष्पाताई चंद्रकांत उर्फ पंडित कळके व उपाध्यक्षपदी संदीप कृष्णा कांबळे.
विद्या मंदिर वाकरे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ पुष्पाताई चंद्रकांत उर्फ पंडित कळके व उपाध्यक्षपदी संदीप कृष्णा कांबळे.
------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
करवीर तालुक्यातील वाकरे येथील प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ पुष्पाताई चंद्रकांत उर्फ पंडित कळके तर उपाध्यक्षपदी संगीत कांबळे यांची निवड करण्यात आली
या बाबत अधिक माहिती अशी की प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक लोकशाही पद्धतीने व मतदानाद्वारे घेण्यात आली या निवडी वेळी दोन्ही उमेदवार मतदान समान झाले व पुन्हा व पुन्हा संभ्रम अवस्था निर्माण झाली व दोन्ही उमेदवारांनी मतदान इक्वल झाल्यानंतर दोघांनीही विश्वासात घेऊन सदस्यांना चिट्ठी द्वारे दोन नावांपैकी एक नाव घोषित करण्यात आले त्या चिठ्ठीमध्ये सौ पुष्पाताई चंद्रकांत उर्फ पंडित कळके यांचे नाव आल्याने त्यांची एकमताने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
या निवडीवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , संदीप कांबळे, नागेश शिंदे, लक्ष्मण पाटील, वनिता पाटील, सचिन पवार, दत्तात्रय चौगुले, अजित सुतार, स्वप्नाली येरुडकर, प्रियांका वाकरेकर, स्नेहल पाटील, दिपाली चौगुले, इत्यादी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते व शिक्षक प्रतिनिधी मारुती चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषभ पाटील, आदिती माने, व मुख्याध्यापक पांडुरंग कुंभार व शिक्षक शिक्षक वृंद व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच सौ पुष्पाताई चंद्रकांत उर्फ पंडित कळके यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यावरती वाकरे परिसरातील जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,
No comments: