अनिल पाटील यांची जैन बोर्डिंग संचालक पदी निवड.
अनिल पाटील यांची जैन बोर्डिंग संचालक पदी निवड.
--------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------
कुंभोज गावाचे सुपुत्र, अनिल बाबासाहेब पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंग, कोल्हापूर च्या नूतन कार्यकारणी संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे कुंभोज जिल्हा परिषद सदस्य व माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी कुंभोज येथे प्रत्यक्ष भेटून सत्कार केला .
नूतन जबाबदारीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या नेतृत्व आणि समाजासाठी त्यांच योगदान खूपच प्रेरणादायक आहे. आशा आहे की, या नव्या कार्याच्या माध्यमातून जैन समाजाच्या प्रगतीसाठी नेतृत्व आणखी बलवान होईल आणि सर्वांगीण समृद्धी आणण्यास मदत होईल.पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक कोळी, सुरेश भगत, समीर भोकरे उपस्थित होते.
Comments
Post a Comment