वाढदिवसाचे औचित्य साधून कै शामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिरात कथा कादंबरी पुस्तकाचं वाटप.
वाढदिवसाचे औचित्य साधून कै शामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिरात कथा कादंबरी पुस्तकाचं वाटप.

----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगवडे या गावामधील कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या शाळेमध्ये आज सकाळी एक वेगळा कार्यक्रम करण्यात आला शाळा सुरू होऊन 20 ते 25 दिवस झालेत शाळा सुरू झाली आणि एक नवीन उपक्रम राबविण्यात आला आज सातवी मधील विद्यार्थी अथर्व जितेंद्र जाधव याचा वाढदिवस होता वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या घरच्यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा कराण्याचे ठरवले आणि शाळेत मुलांना चॉकलेट देण्याऐवजी काही गोष्टीची पुस्तके देण्याचा निर्णय घेतला आज सकाळी त्या विद्यार्थ्याने शाळेमध्ये नऊ गोष्टीची कथा कादंबरी पुस्तके दिलीत सर्व शिक्षक आणि मॅडमनी तसेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक अनोखी उपक्रम साजरा झाला प्रत्येक विद्यार्थ्याने जर असा उपक्रम जर साजरा केला तर मुलांना शाळेची पुस्तके वाचण्याबरोबर काही गोष्टीची थोर व्यक्तींची शूरवीर पराक्रमी वीरांची वीरांगणीची छोटी चुटकुले छोट्या गोष्टी बरंच काय असं वाचायला मिळेल शाळेचा अभ्यास झाल्यानंतर मुलांनी या गोष्टीची पुस्तके वाचली तर त्यांच्या मनाला पण जरा बरं वाटेल मन प्रज्वलित होईल या बोधकथा गोष्टीची पुस्तकं वाचल्यामुळे मुलांच्या मनावर अभ्यासाचा ताण जो होता तो कमी झाल्यासारखा वाटेल असाच उपक्रम जर प्रत्येक मराठी शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये जर राबविण्यात आला तर वर्ष दोन वर्षात शाळेमध्ये लायब्ररी तयार होईल मुलांना शाळेच्या पुस्तका बरोबर गोष्टीची पुस्तकं कथा कादंबऱ्या जर वाचायला मिळाल्या तर त्यांना पण बरे वाटेल एक नवीन संकल्पना राबविण्यात आलेली आहे प्रत्येकाने अशी संकल्पना राबवावी या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक खराडे सर गुरव सर गवळी सर जाधव सर पाटील सर कुंभार मॅडम पाटील मॅडम सामाजिक कार्यकर्ते वैभव सनदी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment