केंद्रीय प्राथमिक शाळा मांजरे या शाळेला ग्रामस्थ व कमिटीच्या वतीने ठोकण्यात आले टाळे.
केंद्रीय प्राथमिक शाळा मांजरे या शाळेला ग्रामस्थ व कमिटीच्या वतीने ठोकण्यात आले टाळे.
----------–-----------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
मो .9404477703
-----------–-----------------
केंद्रीय प्राथमिक शाळा मांजरे या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या व शिक्षण कमिटीच्या वतीने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जोपर्यंत शाळेवरती शिक्षक हजर होत नाहीत तोपर्यंत शाळेला लावण्यात आलेले टाळे काढले जाणार नाही शाळेत सध्या पहिली ते सातवी पर्यंत दोन शिक्षक कार्यरत आहेत एक शिक्षक येईन वाडकर पंधरा दिवस झाले हजर नाही तर हजर असणारे मुख्याध्यापक त्याच्या बदलीची मागणी देखील या ठिकाणी गावकऱ्यांनी केलेले आहे तरी मांजरे गावातील प्राथमिक शाळा ही केंद्रीय शाळा असल्यामुळे इथे चांगल्या पद्धतीची पटसंख्या आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ शिक्षक हजर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल
असे गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती मांजरे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले
यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दीपक कांबळे , शिक्षण कमिटीचे अध्यक्ष बी एम पाटील, बाबुराव पाटील, बबन वायकुळ, रामचंद्र पडवळ , विष्णू पाटील, अण्णा पाटील, दत्ताराम वारे, रवींद्र परब सुरेश परब राजाराम आढाव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
Comments
Post a Comment