रेंदाळ येथील महादेव मंदिर व दत्त मंदिर क वर्ग दर्जा मिळावा तसेच विकास कामाकरिता निधी मिळावा - शिवाजी कोळी.
रेंदाळ येथील महादेव मंदिर व दत्त मंदिर क वर्ग दर्जा मिळावा तसेच विकास कामाकरिता निधी मिळावा - शिवाजी कोळी.
----------------------------------
रेंदाळ प्रतिनिधी
सचिन कुंभार
----------------------------------
रेंदाळ तालुका हातकणंगले येथील दत्त मंदिर व महादेव मंदिर गावातील खुप जुने मंदिर आहेत गावाची लोकसंख्या व तेथे येणाऱ्या भक्तांची संख्या पाहता तेथील मंदिरसाठी निधी मिळावा व तेथील भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून क वर्ग दर्जा मिळावा ही मागणी शिंदे गटाचे युवासेना शहर प्रमुख यांनी पालकमंत्री मा.श्री.प्रकाशजी आबिटकर यांना क वर्ग दर्जा व विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी लेखी निवेदन दिले महादेव देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे दर्शनासाठी रेंदाळ बरोबर कर्नाटक सीमा भागातील भाविक भक्तांची श्रद्धा असून मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात या ठिकाणी मुलभूत सुविधा नसल्याने भक्तांची गैरसोय होत असते यामुळे क वर्ग दर्जा मिळून मंदिरासाठी निधी मिळावा व भक्तांची होणारी गैरसोय टाळावी यासाठी शिवाजी कोळी व गावातील नागरिकांची मागणी आहे.यावेळी निवेदन देताना शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश माळी, धनंजय कोळी,गुंडा तांबे,गुरू कोळी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment