बिद्रीतील पाटील कुटुंबियांचा अनोखी सामाजिक बांधिलकी.
बिद्रीतील पाटील कुटुंबियांचा अनोखी सामाजिक बांधिलकी.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा प्रकाश खतकर
------------------------------------
जीवनात आनंद शोधण्याची प्रत्येकाची वाट वेगळी असते.आनंदी जीवन म्हणजे फक्त हसणे किंवा सुखाच्या क्षणांचा अनुभव घेणे नव्हे,तर प्रत्येक क्षणात समाधान शोधणे असंच म्हणावं लागेल श्रवणाच्या पहिल्याच दिवशी
बिद्री येथील संदेश पाटील व सतीश पाटील यांच्या अनोख्या सामाजिक बांधिलकीची भागात चर्चा होत आहे.
बिद्री (ता. कागल)येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षीप्रेमी पांडुरंग पाटील यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला. वडीलांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दोघां बंधूनी चक्क ५०० महिलांना गणपतीपुळे आणि मार्लेश्वर या तीर्थस्थळांचे दर्शन घडवून एक सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या बांधीलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी त्यांनी
गरजूंना आर्थिक मदत, विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत आणि आरोग्य विषयक सहकार्य करत होते याशिवाय गेल्या वेळी पाटील कुटुंबीयांनी १७० महिलांना पंढरपूरची तीर्थयात्रा घडवून आणली होती.वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्याने पाटील कुटुंबीय अनावश्यक खर्च न करता सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा करत आहेत.
याबाबत गायत्री रविराज पाटील म्हणाल्या की ग्रामीण भागातील महिला केवळ शेती,चूल आणि मूल म्हणत गुरफटल्या आहेत. अशा महिलांना श्रावण महिन्याच्या निमित्ताने देवदर्शन व्हावे,यासाठी आम्ही कुटुंबियांनी हा निर्णय घेतला आहे.
Comments
Post a Comment