नूतन पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मुंबईत घेतली भेट.
नूतन पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मुंबईत घेतली भेट.
---------------------------------
नांदेड जिल्हा प्रतिनिधी.
अबांदास पवार
---------------------------------
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी आज आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या वसंत नगर येथील निवासस्थानी दिनांक 13 जुलै रोजी जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीनंतर आज प्रथमच नवनियुक्त पदाधिकारी यांनी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळामध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक. माजी आ.मोहनराव हंबर्डे, माजी आ.अविनाशराव घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष माधव पावडे, शेषेराव चव्हाण आदींची उपस्थिती होती.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश मिळवून देण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने तळमळीने कामाला लागावे. एकमेकांच्या मनात कोणत्याही शंका कुशंका न ठेवता पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करावे निश्चितपणे आगामी काळातही अनेकांना अनेक पदांवर संधी दिली जाईल असा विश्वासही अजितदादांनी यावेळी दिला. अजितदादांच्या या ग्वाहीनंतर आणि भेटीनंतर पदाधिकाऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.
Comments
Post a Comment