हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.
हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.
--------------------------------
नांदेड जिल्हा प्रतिनिधी.
अबांदास पवार
--------------------------------
नांदेड: नायगाव विधानसभेचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधक नांदेड श्री अशोक भिलारे यांना फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिथे राहता तिथे येऊन चड्डी काढून भोंगळ करून मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी कुणबी मराठा समाजाच्या वतीने माधव पाटील पवळे, गणेश पाटील ढगे, अनिल पाटील चिमेगावकर सह काँग्रेसचे श्रावण रापणवाड, संजय वाघमारे यांनी भिलारे यांची भेट घेऊन त्यांचे शाल देऊन स्वागत केले व कुठल्याही प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांना दिली. राजेश पवारामध्ये हिम्मत असेल तर भिल्लारे यांना बोट लावून दाखवावे असे आव्हान कुणबी मराठा समाजाच्या वतीने माधव पाटील पवळे यांनी केलेले आहे.
नरसी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासक नेमण्याच्या बाबीवरून नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक यांना अश्लील व खालच्या भाषेत शिवीगाळ केलेली आहे नव्हे तर तुम्ही जिथे राहता तिथे येऊन तुमची चड्डी काढून भोंगळे करून मारण्याची धमकी दिलेली आहे. सदरील प्रकरण महाराष्ट्रभर व विधानसभेमध्ये ही चर्चिले जात असताना नांदेड जिल्ह्यातील कुणबी मराठा समाज संघटनेच्या वतीने श्री अशोक भिलारे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन समाजाच्या वतीने त्यांचं शाल देऊन स्वागत करून त्यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज उभा टाकणार असल्याची ग्वाही त्यांना देण्यात आली प्रसंगी कुणबी मराठा समाज हा आक्रमक झालेला असून राजेश पवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करणे अश्लील भाषेत संभाषण करणे हे योग्य नसून त्यांनी कायदेशीर बाबीचा वापर करून त्यांची बदली करणे किंवा त्यांची चूक असेल तर त्यांना निलंबित करणे हे कायदेशीर बाब करणे आमदार म्हणून उचित असताना त्यांनी एखाद्या वयस्कर अधिकाऱ्याला ज्यांची रिटायरमेंट ही पंधरा दिवसावर आलेली असताना त्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करणे हे एखाद्या आमदाराला अशोभनीय आहे त्यामुळे त्यांचा आम्ही समाजाच्या वतीने निषेध करतो आणि जर आमदार राजेश पवारामध्ये दम असेल तर त्यांनी भिल्लारेंना बोटच लावून दाखवावं अशा पद्धतीचे आव्हान कुणबी मराठा समाजाच्या वतीने माधव पाटील पवळे यांनी दिले आहे प्रसंगी गणेश पाटील ढगे, अनिल पाटील चिमेगावकर, श्रावण रापणवाड ,संजय वाघमारे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment