लोहा पालिकेवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोर्चा धडकला ; महिलांचा लक्षणीय सहभाग.
लोहा पालिकेवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोर्चा धडकला ; महिलांचा लक्षणीय सहभाग.
------------------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
------------------------------------
शहरातील नागरिकांना स्वच्छता, साफसफाई पाणी पुरवठा घरकुल योजनेसह इतर मुलभूत सोयी सुविधा देण्यात याव्या यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा भव्य मोर्चा मंगळवारी लोहा पालिकेवर धडकला मोर्चात हजारोंची उपस्थिती होती. मोर्चातील महिलांचा लक्षणीय सहभाग सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोहा पालिकेला मोर्चा काढण्याचा इशारा पूर्वीच निवेदनाद्वारे दिला होता. पालिकेकडून मोर्चा काढण्यात येऊ नये अशी विनंती काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिली होती. सोमवारी मुख्याधिकारी यांच्या दालनात काँग्रेसचे प्रमुख नेत्यांसोबत चर्चाही झाली मात्र बैठक निष्फळ झाल्याने मंगळवारी काँग्रेस पक्षाचा हजारोंचा मोर्चा पालिकेवर काढण्यात आला. प्रारंभी जुना लोहा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे लोहा कंधार विधानसभा प्रभारी एकनाथ मोरे, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, कंधार चे तालुकाध्यक्ष माजी जि. प. सदस्य संजय भोसीकर, लोहा तालुकाध्यक्ष मधुकर पाटील दिघे, शहराध्यक्ष माजी नगरसेवक वसंत पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी जि. प. सदस्य श्रीनिवास मोरे, माजी जि. प. सभापती संजय पाटील कऱ्हाळे, गणेश घोरबांड, शिवाजी आंबेकर, सरपंच बाबासाहेब बाबर यांनी केले.
लोहा शहर वाशीयांना मूलभूत सोई सुविधा पुरविण्यास पालिका अपयशी ठरली असा आरोप करून शहरातील नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, शहरात स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, नागरिकांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावून लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल योजनेचे हप्ते वितरीत करावे, उघड्यावरील व वस्तीतील मांसाहारी खानावळी बंद कराव्यात, गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्याचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने दिले. सदरील मोर्चात पालिकेचे माजी नगरसेवक उत्तम महाबळे, शहर उपाध्यक्ष श्याम पाटील नळगे, युवा नेते विक्रांत नळगे, गजानन कळसकर, अमोल महामुने, संजय पवार, सत्तार शेख, राजेश ताटे, छत्रपती कदम, कृष्णा दाभाडे, विनोद लोढा, लक्ष्मण गायकवाड, विनोद पांचाळ, पुरभा सावळे, संभाजी सावळे सह बहुसंख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
▪️ इंदिरा नगर भागातील महिलांनी मोर्चा दरम्यान माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांना गराडा घालून परिसरातील समस्यांचा आणि घरकुल हप्ता त्वरित देण्यासाठी विशेष लक्ष घालावे तसेच परिसरातील समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.

No comments: