स्वराज संघटनेच्या निवेदनाची आयुक्तांनी घेतली दखल आयुक्तांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष.

 स्वराज संघटनेच्या निवेदनाची आयुक्तांनी घेतली दखल आयुक्तांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष.

--------------------------------- 

कोल्हापूर प्रतिनिधी

संस्कार तारळेकर 

--------------------------------- 

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार  संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. दिपक कांबळे साहेब,  संस्थापक तथा मुख्य महासचिव मा. श्री कमलेश शेवाळे ( देवा सर )महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षl. मा. सौ. धनश्री उत्पात मॅडम विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा श्री. प्रशांत निकम साहेब यांच्या मार्गदर्शते खाली , कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची समक्ष भेट घेत, लक्ष्मीपुरी व्यापार पेठेतील प्रतिबंधित प्लास्टिकच्या होलसेल विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून, संबंधित व्यापाऱ्याला वेळोवेळी महानगरपालिकेच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांकडून मिळालेली साथ संघटनेने पुराव्यानिशी आयुक्तांना सुपूर्द  करीत कारवाई बाबतचे निवेदन  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले.


 आयुक्तांनी याबाबत  स्वतः जातीनिशी लक्ष घालून या गंभीर प्रकरणात भ्रष्ट कर्मचाऱ्यांना सोडणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच शहरात हजारो किलो प्रतिबंधित प्लास्टिक रोज विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल याबाबत आश्वासन दिले. स्वराज्य  पोलीस मित्र पत्रकार पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेने अतिशय अभ्यासपूर्ण आणि पुराव्यानिशी  तक्रार दाखल केल्यामुळे आयुक्तांनी संबंधित निवेदन या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोल्हापूर महानगरपालिका प्लास्टिक मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.  या वेळी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे कोल्हापूर  जिल्हाध्यक्ष, पी.डी. सरदेसाई सर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव मा सौ. वैशाली कांबळे  यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.