आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त कुडाळ येथे सहकार परिषद संपन्न.

 आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त कुडाळ येथे सहकार परिषद संपन्न.

-------------------------------

 जावली प्रतिनिधी  

शेखर जाधव 

-------------------------------

सातारा/जावली  :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसेच अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचे निसि:म भक्त स्व. राजेंद्र शिंदे यांचे स्मृती दिनाचे औचित्य साधुन प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सौरभ बाबा  शिंदे यांनी सहकार परिषदेचे कुडाळ येथे आयोजन केले होते सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि त्यामाध्यमातून त्या-त्या संस्थांच्या मुळे शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी झाली. जावली तालुक्यातही सहकाराच्या माध्यमातून कायापालट होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.सहकारात काम करणाऱ्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहीजे सहकाराबदल नवनवीन माहीती मिळाली पाहीजे म्हणून सहकार परिषदेचे आयोजन केलेचे  कुडाळ येथे सहकार परिषदेत ते बोलत होते.जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक म्हणाले पिक कर्जा सोबत संस्थांनी व्यवसाय करणे गरजेचं आहे वसंतराव मानकुमरे म्हणाले  सहकारात काम करताना चुकीचं काम होणार नाही याकडे सर्वांनी गार्भियान पाहीलं पाहीजे. जावळी तालुक्यातील सहकार वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणेची ग्वाही जिल्हा बॅकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे,जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक,जिल्हा बँकेचे व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे आदी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले महेश बारटक्के यांनी मनोगत व्यक्त केले सहकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या मार्गदर्शक संचालिका सुनेत्राताई शिंदे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जावळीचे सहाय्यक निबंधक सुनिल जगताप,जिल्हा बँकेचे व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे,यशवंत साळुंखे, नामदेव सावंत,जावळी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, व्हा चेअरमन चंद्रकांत  दळवी, युवा नेते सागर धनावडे,पांडुरंग जवळ, शिवाजीराव मर्ढेकर,आनंदराव जुनघरे, दिलीप वांगडे,जयदीप शिंदे,विलास बाबा जवळ, जावळी बँक संचालक विश्वनाथ धनावडे, विजय सावले, संदिप परामणे, मारुती चिकणे सर्व सोसायटींचे चेअरमन, सचिव, जिल्हा बँक अधिकारी, कर्मचारी विविध संस्थाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

         तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा,सचिवांचा विशेष गौरव करणेत आला  तालुक्यातील ५१ विकास सोसायट्या, तसेच जावली सहकारी बँक, प्रतापगड साखर कारखाना, जावली तालुका खरेदी विक्री संघ, विविध सहकारी पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांचा व पदाधिकाऱ्यांचा सन्मान तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला.


❌चौकट :- सहकार परिषदेत  विकास सेवा सोसायटीची, तसेच सोसायटीचा कणा म्हटलं जातं त्या सोसायटीत काम करणाऱ्या सचिवांची दखल घेतलेबद्दल प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सहकार परिषदेचे आयोजक सौरभ बाबा शिंदे यांचे जावळी तालुक्यातील सचिव यांनी आभार मानले

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.