कागल येथे शिक्षकाचा विहिरीत पडून मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद.
कागल येथे शिक्षकाचा विहिरीत पडून मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद.

--------------------------------------------------------
शशिकांत कुंभार
-------------------------------------------------------
कागल : कागल येथील मुरगुड नाका, हॉटेल प्रणवजवळ असलेल्या एका विहिरीत पडून मारुती शांताराम व्हरकट (वय ५५) या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी ११.१५ च्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती व्हरकट हे कागल नगरपालिकेच्या विभागीय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते फ्लॅट नं. ३, सिद्धिविनायक अपार्टमेंट, ब्रम्हपुरी गल्ली, कागल येथे राहत होते. त्यांचा मुलगा, प्रणव मारुती व्हरकट (वय २५, व्यवसाय शिक्षण) यांनी याबाबत कागल पोलीस ठाण्यात वर्दी दिली. दुपारी २ च्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीतून शोधण्यात आला. या घटनेची नोंद महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ए.एस. पाटील यांनी घेतली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार डोईफोडे करत आहेत. या घटनेमुळे कागल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments: