स्थानिक स्वराज्य निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार.
स्थानिक स्वराज्य निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार तारळेकर
--------------------------------
वंचित बहुजन आघाडी करवीर तालुक्याच्या वतीने कसबा बावडा सर्किट हाऊस कोल्हापूर येथे मीटिंग आयोजित केली होती
मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रभारी महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. क्रांतीताई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पक्ष प्रमुख देतील त्या आदेशाप्रमाणे निवडणूक लढवल्या जातील. प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियान, करवीर तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा झाली पाहिजे .या करिता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.या वर सर्वानुमते विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित
भिमराव गोंधळी वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका अध्यक्ष, रमेश पोवार करवीर उपाध्यक्ष अर्जुन कांबळे करवीर सचिव, अर्जुन गोंधळी करवीर महासचिव मल्हार शिर्के, सारंग कांबळे, संतोष कांबळे माथाडी अध्यक्ष, शिवाजी कांबळे, संदीप गोंधळी अमोल कांबळे, भीमराव माने, प्रतीक कांबळे, कबीर चोरटे, अर्जुन चव्हाण, विवेक रजपूत, सागर चव्हाण, दीपक डोणे, शंकर कांबळे, अमर कांबळे, उपस्थित होते..!
Comments
Post a Comment