Header Ads

संदीप (आबा) गिड्डे यांना दुगंधभिषेक राजकीय आकसापोटी पक्षद्रोही कारवाई :प्रशांत केदार.

 संदीप (आबा) गिड्डे यांना दुगंधभिषेक राजकीय आकसापोटी पक्षद्रोही कारवाई :प्रशांत केदार.

-------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

 राजू कदम

-------------------------------------

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप (आबा) गिड्डे-पाटील यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने बडतर्फ कारवाई केली आहे.निष्ठावन्त गिड्डेवरील कारवाई अन्यायकारक व पक्षास हानिकारक आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या निष्ठावान गिड्डेवर केवळ राजकीय आकसापोटी कारवाई केली आहे.असा आरोप राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला आहे.यावेळी राज्य संपर्क प्रमुख युनूस कोल्हापूरे,निशांत आवळेकर उपस्थित होते.


     तासगाव बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून संदीप गिड्डे-पाटील यांचे प्रतिमेस दुग्धभिषेक घालण्यात आला.तसेच फुलांचा वर्षाव करून गिडेंच्या कार्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी संदीप गिड्डे-पाटील यांचे समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


     संदीप गिड्डे-पाटील हे राष्ट्रीय स्वयंम संघाच्या तालमीत तयार झालेले कार्यकुशल नेतूत्व आहे.गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच मराठा समाज आरक्षण आंदोलनात अग्रभागी सक्रिय होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्याचे काम गिड्डे यांनी केली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात बहुजन समाजातील रखडलेल्या अनेक कामांसाठी मोठा निधी आणला आहे.


      मतदार संघात भाजप पक्ष ताकतीने वाढविण्याचे काम संदीप गिड्डे-पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.जनतेची कामे करून रयतेचे राजे म्हणून उदयास येत असलेले गिड्डे-पाटील काहीं वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खुपत असून त्यांना वरचढ ठरत आहेत.परिणामी त्यांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता लागून राहिली आहे..तेंव्हा राजकीय आकसापोटी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना विचारत न घेता जिल्हाध्यक्षानी एकतर्फी संदीप गिड्डे यांच्यावर कारवाई केली.ही कारवाई म्हणजे कोतवालाने विभागीय आयुक्त यांना निलंबित केल्यासारखे आहे.निष्ठावन्त भाजपा कार्यकर्त्यांवरील निलंबन कारवाई पक्षद्रोही कारवाई आहे.याचा भाजपा पक्षाला मोठा फटका बसू शकतो.


         राष्ट्रीय स्वयंम संघात तयार झालेल्या गिड्डे यांच्यावरील कारवाई ही संघ प्रणाली व तत्वांना धरून नाही.तेंव्हा प्रामाणिक व निष्ठावान गिड्डेवर चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करण्यात आला.जिल्ह्यात वरिष्ठ नेत्यांचा मनमानी कारभार चालू राहिल्यास भाजपा संपुष्टात येईल हे सांगण्यास कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही.असे मत राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी संदीप गिड्डे पाटील यांचे समर्थनार्थ बोलताना व्यक्त केले.


      यावेळी संघटनेचे राज्य संघटक युनूस कोल्हापूरे,निशांत आवळेकर,युवती राज्याध्यक्ष प्रमिला गावडे,जिल्हाध्यक्षा विजया माळी,कुलदीप वारे,हरीश वडार,गुरुनाथ दाभडे,पिंटू केंगार,द्रौपदी बनसोडे,दृष्टी कांबळे,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.