अंबप येथे शाळेच्या मैदानात घुसला गवा.विद्यार्थ्यी व शिक्षक जखमी: नागरीक व पालकांच्यात घबराट.
अंबप येथे शाळेच्या मैदानात घुसला गवा.विद्यार्थ्यी व शिक्षक जखमी: नागरीक व पालकांच्यात घबराट.
----------------------------
अंबप प्रतिनिधी
----------------------------
अंबप (ता.हातकणंगले) येथे शनिवारी नागरी वस्तीत गवा शिरला तेथून थेट शाळेच्या मैदानात व मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये शिरल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या घबराट निर्माण झाली. यात शिक्षक व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे अंबप गावात दिवसभर या गव्याची चर्चा होती.
शनिवारी सकाळी तळसदेंच्या बाजूने जंगम गल्ली येथून गवा गावात शिरला तो तळेच्या दिशेने आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मिळतात सरपंच दीप्ती माने यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून संदेश दिला. यावेळी जवळच असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मैदानात शिरला सुदैवाने यावेळी येथे विद्यार्थी नव्हते. गवा बाजार कट्ट्याहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या गेटमधून जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस गवा आला. या शाळेच्या मागील बाजूस अंबप हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या मैदानावर सुमारे ९०० विद्यार्थी कवायत सुरू होते. या परिसरात गवा आल्याचे बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्जेराव जाधव यांना समजताच त्यांनी तत्काळ शिपायांना गेट जवळ उभे केले. गवा शाळेच्या कंपाउंडवरून उडी घेऊन अंबप हायस्कूलच्या मैदानात शिरला गवा पाहून विद्यार्थी सैराभर पळू लागले. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले. बिथरलेल्या गवा सरळ कार्यालयात घुसला व समोर येईल त्या वस्तू शिंगाने उडवू लागला. लिपिक दिनकर पाटील व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा चव्हाण यांना जखमी केले.
गवा पुन्हा फिरून शाळेच्या मैदानाच्या पुर्वेकडे धावला समोर दत्ता हिरवे यांच्या कौलारू घरावर उडी मारली कोलारू घर असल्यामुळे त्याचे पाय अडकले व घरावरच अडकला तो इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळात जवा पुन्हा मैदानावर आला. पुन्हा इकडे तिकडे धावू लागला यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलत गेटच्या बाहेर घालवले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला पुन्हा तो गवा पाडळीच्या दिशेने नागरिकांनी हक्काला. सुमारे पंधरा मिनिटे शाळेच्या आवारात हा थरार विद्यार्थी व शिक्षकांनी अनुभवला काही शिक्षकांनी तर मृत्यूच सामोर बघितला.
या घटनेनंतर सरपंच दीप्ती माने संस्थेचे कार्याध्यक्ष विकास माने अध्यक्ष विजयसिंह माने यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना व पालकांना धीर दिला तसेच त्यांनी वनविभाग अशी संपर्क केला. पण वन विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन उचलला नसल्याने व दिवसभरही इकडे फिरकले नसल्याने नागरिक व पालकांचातून संताप व्यक्त होत होता.
.

No comments: