छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
--------------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
--------------------------------
31 जुलै रोजी छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने दक्षिणचे आमदार माननीय श्री अमोल महाडिक साहेब यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात आला बरेच गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्यापैकी पट्टणकोडोली वसगडे गडमुडशिंगी सांगवडे या गावातील ग्रामपंचायत मंदिर परिसर विकास सोसायटी आणि मराठी शाळा अशा बरेच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले त्यापैकी एक कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मध्ये सांगवडे या ठिकाणी सोमवार दिनांक 27 जुलै 2025 आज सकाळी शाळेमध्ये साडेअकरा वाजता छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे काही ऑफिस स्टॉप कर्मचारी यांनी कडुलिंब चिंच वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची विविध प्रकारची झाडे घेऊन शाळेमध्ये आले होते त्यांनी या मराठी शाळेमध्ये चिंचेचे फुलाचे कडुलिंबाचे अशा प्रकारची झाडे त्यांनी शाळेमध्ये वृक्षारोपण केले या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य सनी काशींबरे ग्रामपंचायत सदस्य विशेष कार्यकारीअधिकारी शितल भेंडवडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात आला गुरव सरांनी या साखर कारखान्याच्या सर्व स्टॉप चे आभार मानले या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची कर्मचारी ऑफिस स्टॉप ग्रामपंचायत सदस्य शितल भेंडवडे ग्रामपंचायत सदस्य सनी काशींबरे गुरव सर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सभासद उदय मोहिते (सरकार) रोहित पाटील जितेंद्र जाधव महेश कटके गजेंद्र (गजू ) यादव बरेच कार्यकर्ते उपस्थित होते
No comments: