Header Ads

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाथाजी पाटील यांनी केले अभिनंदन..

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाथाजी पाटील यांनी केले अभिनंदन..

*************************

गारगोटी- स्वरूपा खतकर

************************

     महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे काम सुलभ होण्यासाठी आपल्या महसुल खात्यामध्ये विविध क्रांतीकारी निर्णय घेतल्या बद्दल महसुलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे, कोल्हापूर जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी अभिनंदन केले.

      तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांनी करवीर निवासिनी श्री आंबाबाई देवीची प्रतिमा दिली.

      महसुल विभागा कडून नागरीकांना अनेक दाखल्यांची आवश्यकता असते. त्यासाठी वारंवार तहसिल कार्यालय येथे जावे लागते . पुर्वी शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी स्टॅप ड्यूटी भरावी लागत होती. ती बंद करण्यात आली .

    शालेय विद्यार्थ्यांना विना स्टॅप दाखले, कौटुंबीक वाटणी पत्रासाठी स्टॅप ड्युटीवर शिथिलता, तुकडे जोड तुकडे बंदी खरेदी कायदा रद्द करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू देणे , असे अनेक निर्णय महसूल विभागामार्फत घेतल्याने नागरीकांना भोगावा लागणारा नाहक त्रास कमी झाला असल्यानेअसे नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली .

No comments:

Powered by Blogger.