कुंभोज जैन समाजाचे हातकणंगले पोलीस व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.
कुंभोज जैन समाजाचे हातकणंगले पोलीस व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.

*****************************
विनोद शिंगे कुंभोज
*****************************
जाती पातीच्या अभेदय भिंतीना माढून टाकून शिक्षणाची दारे बहुजनांसाटी खुले करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेच्या " कुंभोज जन्मभुमीत" कार्यरत असणार्या संकुलातील एका जवाबदार व्यक्तीने जातीय विचाराने प्रेरित होवून एखादे वाक्य आपल्या स्टेटसवर टेवले. अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे. नांदणी मठातील हत्तीवे परिसरातील लोकांशी असलेले आपुलकीचे नाते प्रत्येक अश्रूतून प्रतिविंवर्वीत होत होते. ज्या समाजात" जगा आणि जगूया" हा जीवनाचा मूलमंत्र आहे त्या समाजाची नांदणी गठातील माधुरी / महादेवी हत्तीण यांच्या सोबत भावनिक संबंध होते. अख्खा परिसर व जनमाणसे या घटनेने हळहळली.
पण अश्या प्रसंगात जातीयतेचे विष ज्यांचा मनात व डोक्यात आहे असे स्यत शिक्षण संकुल कुंभोज येथील मा. मुख्याध्यापक सागर गाने या व्यक्तीने देशातील विविध समस्येवर हा समाज चकार शब्द काढत नाही तर समाजाचे रडवे प्राण्यांसाठी नसून धार्मिक अस्मितांसाठी जोडले आहे असा आरोप करणे हे समाजाच्या भावना दुखावणारे आहे. दुखावलेला जनसमुदाय उसळल्यास वाईट प्रसंग उद्भवू शकतो.
तरी असले वक्तव्य करणाऱ्या, विषारी विचार पेरणाऱ्या विषारी भावना पसरवणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेत यावी. अशी मागणी हातकणंगले पोलीस स्टेशन व आतमध्ये गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे समस्त जैन समाज व ग्रामस्थ कुंभोज यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी दिगंबर जैन बोर्डी चे संचालक अनिल पाटील शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिल भोकरे ,समीर भोकरे ,अजित गोपोडगे, रवी उपाध्ये, अभिनंदन चौगुले, सुनील वाडकर,बबन भिमराय, कुमार मासुले,पोपट चौगुले, बापुसो पाटील ,महावीर पाटील,तसेच जैन समाजातील तरुण मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते
No comments: