राधानगरी तालुक्यातील ९८ सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर.

राधानगरी तालुक्यातील ९८ सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर.

------------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------------ 

राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीकरिता एकूण ९८ सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत सोमवार दि.२१ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता राधानगरी येथील पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात काढण्यात आली. यासाठी तहसिलदार अनिता देशमुख, नायब तहसीलदार बिपिन लोकरे, महसूल सहाय्यक प्रीतम हिंगमिरे, निवडणूक ऑपरेटर सचिन पाटील यांना प्राधिकृत करण्यात आले होते. आरक्षित पदांमध्ये अनुसूचित जातीसाठी


(एकूण ११ त्यामध्ये पुरुष ६ तर महिला५), नागरिकांचा मागास प्रवर्ग (एकूण २७ त्यामध्ये पुरुष १३ तर महिला १४, आणि सर्वसाधारण गटासाठी एकूण ६० त्यामध्ये पुरुष ३० तर महिला ३० पदे आरक्षित करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी ठीक १२.३० वाजता आरक्षणाच्या सोडतीच्या चिट्टचा शालेय विद्यार्थी दूर्वा टिपूगडे व विहान भोगुलकर शाळकरी मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या.


तालुक्यातील गावनिहाय आरक्षण खालील प्रमाणे.


अनुसूचित जाती तारळे खुर्द, धामोड, ओलवण, गुडाळ-


गुडाळवाडी, बुजवडे, बुरंबाळी


अनुसूचित जाती राखीव महिला कोते, कोदवडे, कपिलेश्वर, आटेगाव, पडळी


नागरिकांचा मागास प्रवर्ग: सावर्डे.पा., शेळेवाडी, पाटपन्हाळा, खिंडी व्हरवडे, मालवे, वाघवडे, तिटवे, अर्जुनवाडा, म्हासुर्ली, सिरसे, आकनुर, खामकरवाडी, धामणवाडी, राशिवडे, खुर्द, चाफोडी तर्फे तारळे, गवशी राधानगरी, शिरगाव, आवळी खुर्द, कोनोली तर्फे असंडोली, मानबेट, सोळांकूर, मोधर्डे, सरवडे, तळगांव, मांगोली, पालकरवाडी


सर्वसाधारण महिला राखीव


: पनोरी, मोहडे, करंजफेण, न्यू करंजे, चंद्रे, मल्लेवाडी, कुडुत्री, तळाशी, ठिकपुर्ती, अणाजे, तुरंबे, येळवडे, सावदें वडाचीवाडी, मांगेवाडी, चाफोडी तर्फ ऐनघोल, केळोशी खुर्द, चक्रेश्वरवाडी, बारडवाडी, बर्गेवाडी, देंगेवाडी, हसणे, कांबळवाडी, कारीवडे, कुंभारवाडी, पिंपळवाडी, रामणवाडी, सुळंबी, कौलव, घोटवड , आपटाळ,


सर्वसाधारण खुला प्रवर्ग तरसंबळे, माजगांव, ऐनी, अडोली, आवळी बुद्रुक, चांदे, नरतवडे, फेजिवडे, सोन्याची शिरोली, कसबा वाळवे कसबा तारळे, कासारपुतळे, माँ जे


कासारवाडा, दुर्गमानवाड, पुंगाव, फराळे, पिरळ-सावर्ध, पडसाळी, पंडेवाडी, राजापूर, बनाचीवाडी, कंथेवाडी-कळकवाडी, मजरे क सारवाडा, घुडेवाडी, चांदेकरवाड १, हेळेवाडी, मुसळवाडी, आमजाई व्हवडे, केळोशी बुद्रुक, राशिवडे बुद्रुक या सोड तीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य उपस्थित होते. या आरक्षणामुळे आगामी पाच वर्षांसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे. हे स्पष्ट झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहिला मिळाला.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.