फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर हल्ला ₹3.18 लाखांचा मुद्देमाल लुटणारी टोळी गजाआड.
फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर हल्ला ₹3.18 लाखांचा मुद्देमाल लुटणारी टोळी गजाआड.
गारगोटी रोडवर वसुलीदारावर मारहाण करून बॅग पळवली; पाच आरोपी व दोन विधीसंघर्षग्रस्त बालक अटक
कोल्हापूर, ता. 13 :
फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यावर हल्ला करून रोख ₹73,000 आणि इतर मिळून ₹3,18,400 किमतीचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. या प्रकरणात पाच आरोपी व दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असा एकूण सात जणांचा समावेश आहे.
तपासानुसार, मुख्य सूत्रधार अविनाश मोहिते याने फायनान्स कंपनीचे हप्ते न फेडता वसुली कर्मचाऱ्याला लुटण्याचा कट रचला. त्याने विजय पुजारीसह साथीदारांना बोलावून 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी गारगोटी रोडवर कर्मचाऱ्याला अडवले, मारहाण केली व पैशांची बॅग लुटली. नंतर रक्कम टोळीने वाटून घेतली.
सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी टेंबलाई मंदिर परिसरात सापळा रचून आरोपींना पकडले. विजय पुजारीवर यापूर्वीही जबरी चोरी, वाहनचोरी आणि मारामारीचे गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने केली.
No comments: