कै.रेवताबाई एकावडे ट्रस्टचा रानभाजी महोत्सव बनाची वाडी लक्षवेधी.
कै.रेवताबाई एकावडे ट्रस्टचा रानभाजी महोत्सव बनाची वाडी लक्षवेधी.
------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
फास्ट पुढच्या जमान्यात ग्रामीण जीवनाला रानभाज्या यांचे महत्त्व कळावे यासाठी राधानगरी येथील रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या व सौभाग्य अलंकार यांच्या वतीने रानभाजी स्पर्धा (महोत्सव) विद्यामंदिर बनाचीवाडी येथे आयोजित केले होती. सुमारे 80 पेक्षा जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला आणि ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच सौ.प्राजक्ता पत्ताडे यांनी केले. स्पर्धेमध्ये 130 पेक्षा जास्त रानभाज्या समाविष्ट होत्या. त्यामध्ये मोरशेंडा, टाकळा, कुर्डू ,आंबोशी आघाडा, आळू, माठ, पोकळा शेवगा, करटोली, टॅटू, कोथ, राजगिरा , चवळी, मेथी, तांदूळ, भारंग आदींचा समावेश होता. कार्यक्रमामध्ये प्रथम पाच विजेत्यांना ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक–दिपाली वंजारे ,द्वितीय क्रमांक–अलका पत्ताडे, तृतीय क्रमांक–सरिता खांडेकर, चतुर्थ क्रमांक–मनीषा पाटील, पाचवा क्रमांक– पूजा धनवडे आदी. सहभागी महिलांना आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमांमध्ये रानभाज्यांचे महत्त्व सामाजिक कार्यकर्ते जयवंत पताडे, प्रा.संतोष मधाळे, ए एम पाटील सर– माजी मुख्याध्यापक न्यू हायस्कूल क//तारळे, व विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा चावरे यांनी सांगितले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.संतोष मधाळे, सुधीर दुरुगडे यांनी परीक्षण केले .कार्यक्रमास सरपंच सौ.प्राजक्ता पताडे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत पताडे, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील चौगुले, विद्या मंदिर बनाची वाडी शाळेच्या मुख्याध्यापिका, सुषमा चावरे शिवाजी पत्ताडे, नकुशी रेडेकर, उपसरपंच सुनीता पताडे, आनंदा पताडे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सौ लता एकावडे, प्रसाद एकावडे, प्रणित एकावडे, सौ. वृषाली एकावडे, ऋतुराज एकावडे, वासुदेव दिघे सर, संभाजी चौगुले, सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी तर आभार वृषाली एकावडे यांनी मानले.
Comments
Post a Comment