कोथळी (ता. राधानगरी) येथे संत बाळूमामा पुण्यतिथीनिमित्त किर्तन सेवा संपन्न..
कोथळी (ता. राधानगरी) येथे संत बाळूमामा पुण्यतिथीनिमित्त किर्तन सेवा संपन्न..
----------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
----------------------------
भक्तिभावाने संपन्न संत बाळूमामा पुण्यतिथी किर्तन सेवा – डॉ. संतोष निकम यांचे प्रेरणादायी विवेचन..
कोथळी, ता. राधानगरी येथे संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत डॉ. संतोष निकम (सातवे, ता. पन्हाळा) यांनी भावपूर्ण किर्तन सेवा सादर केली.
किर्तनात त्यांनी संत बाळूमामा यांच्या जीवनकार्य, समाजसेवा व अध्यात्मिक संदेश यांचे सुंदर वर्णन केले. उपस्थित ग्रामस्थांनी भक्तिभावाने किर्तन ऐकून मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
No comments: