बाजार भोगाव बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा विळखा प्रशासन अलर्ट मोडवर.
बाजार भोगाव बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा विळखा प्रशासन अलर्ट मोडवर.
------------------------------
बाजार भोगाव
सुदर्शन पाटील
------------------------------
गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी व जांभळी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून बाजार भोगाव येथील मोडक्या ओढ्यावरती पाणी आल्याने कोल्हापूर हुन बाजार भोगाव अनुस्कुरा मार्गे राजापूर रत्नागिरीला जाणारा मार्ग दुसऱ्यांदा बंद झाला आहे दरम्यान बाजार भोगाव येथील बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा विळखा पडला असून काही दुकानात पाणी शिरले आहे संभाव्य पुराच्या पार्श्वभूमी वरती प्रशासन अलर्ट झाले असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक असणारी बोट सज्ज ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर इतर यंत्रसामग्री देखील प्रशासनाकडून सज्ज ठेवण्यात आली आहे दरम्यान कासारी नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत असून बाजार भोगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी संभाव्य महापुराचा धोका ओळखून आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे
तसेच पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे
चौकट
कासारी धरणाच्या वक्र दरवाज्यातून 1200 क्युसेक तर विद्युत ग्रहातून 300 क्युसेक असा एकूण पंधराशे क्युसेक विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच पावसाचा जोर वाढून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे
Comments
Post a Comment