रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा जयसिंगपूर उपविभागात 74 गुन्हेगारांवर कारवाई • गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पडावा यासाठी विशेष मोहीम.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा जयसिंगपूर उपविभागात 74 गुन्हेगारांवर कारवाई • गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पडावा यासाठी विशेष मोहीम.
-------------------------------------
जयसिंगपूर, प्रतिनिधी.
नामदेव भोसले..
-------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर उपविभागीय पोलीस विभागाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आज शिरोळ पोलीस ठाण्यात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. यात उपविभागातील 74 गुन्हेगारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश गुप्ता यांच्या आदेशानुसार मा. अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग, कॅम्प इचलकरंजी श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी आरोपींना स्पष्ट सूचना दिल्या की, यापुढे कुणीही गुन्हा केला तर त्याच्यावर मोका, हद्दपारी, एमपीडीए सारख्या कठोर कारवाया करण्यात येतील. तसेच सर्व आरोपींकडून भारतीय नागरीक सुरक्षा संहितेनुसार जातमुचलका व जामिनपत्रे घेण्यात आली.
या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक बसल्याचे दिसून आले असून, आगामी सण शांततेत व सुरक्षिततेत पार पडण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
No comments: