वीर हनुमान दूध संस्थे मार्फत महिला सहल.

 वीर हनुमान दूध संस्थे मार्फत महिला सहल.

---------------------------------

फ्रंटलाईन न्यूज प्रतिनिधी 

आशिष पाटील

---------------------------------

पाडळी बुद्रुक.. श्री क्षेत्र प्रयाग च्या संगमावर वसलेलं गाव. राज्यात राजकारणाची जी स्थिती तीच गावात! विविध पक्षांचे नामांकित नेते! याच राजकारणाचा प्रमुख घटक म्हणजे सहकार. गावचा मुख्य कणा शेती! हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. आणि याच्या जोडीला पशुपालन! कित्येकांनी या जित्रापाच्या जोरावर वैभव उभं केलं आहे!

    गावात विविध सहकारी पतसंस्था, सोसायटी आणि दूधसंस्था आहेत. यापैकी एक श्री वीर हनुमान संस्था! मागील दोन वर्षापूर्वी संस्थेने रौप्य महोत्सव साजरा केलेला. 

    संस्थेचे गोरगरीब सभासद मेहनतीने दूध पुरवठा करत असतात. दर 10दिवसाला बिले अदा केली जातात! एकदम पारदर्शी व्यवहार! . हा एक आदर्श कारभाराचा नमुनाच म्हणावा लागेल!

   संस्थेला प्रगतीपथावर नेणाऱ्या सभासदांना एक भेट म्हणून पर्यटन घडवून आणण्याचा निर्णय चेअरमन, व्हाइस चेअरमन, सर्व संचालक आणि सचिव यांच्या पुढाकाराने 3रात्री 3दिवसांची सहल घडवून आणली. नेहमीच्या काबाडकष्टाला थोडासा विराम मिळावा आणि सभासदांना विरंगुळा मिळावा यासाठी गोकर्ण महाबळेश्वर, उडपी कृष्ण मंदिर, मुर्डेश्वर शिवमूर्ती, मळगे बीच, इंद्रगुंजी महागणपती या ठिकाणी सहल नेण्यात आली. गेलेल्या सर्व दूध उत्पादक सभासदांनी समाधान व्यक्त केले.

     वैरण आणणे, शेणघाण काढणे, धारा काढणे, दूध घालणं ही रोजची कामं. सभासदांना 2-3दिवस निवांत अनुभवता आले. मागचा व्याप विसरून निवांत राहता आल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होती.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.