जयसिंगपूरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त रूट मार्च.
जयसिंगपूरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त रूट मार्च.
-------------------------------
नामदेव भोसले
-------------------------------
गणेशोत्सव 2025 व ईद-ए-मिलाद या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून आज (दि. 26 ऑगस्ट 2025) सकाळी 10.30 ते 11.15 वाजेच्या दरम्यान भव्य रूट मार्च आयोजित करण्यात आला.
हा रूट मार्च पोलीस ठाणे येथून सुरू होऊन डेबोंस कॉर्नर, मच्छी मार्केट, बाजारपेठ, क्रांती चौक, बस स्टॅन्ड व गांधी चौक असा मार्गक्रमण करीत पार पडला.
त्यानंतर गांधी चौक येथे दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पो.उपनिरीक्षक किशोर अंबुडटकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ पोलीस अधिकारी, १५ पोलीस अंमलदार व २५ होमगार्ड सहभागी झाले होते.
सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा रूट मार्च घेण्यात आला.
Comments
Post a Comment