पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघे ताब्यात.
पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघे ताब्यात.
६.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
कोल्हापूर :
पाचगाव येथे गणेशोत्सव आगमन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला बंदुकीच्या धाकावर जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२५ ऑगस्ट रोजी रात्री ऋषिकेश भोसले याचा रणजित गवळी, चेतन गवळी व अरुण मोरे यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी वॅगनआर कारमधून येत भोसलेच्या डोक्याला बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारीनंतर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून विनापरवाना सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतूस, वॅगनआर कार व दुचाकी असा एकूण ६.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पो. उपनिरीक्षक शेष मोरे, व पोलीस अमंलदार प्रविण पाटील, सत्यजित तानुगडे, दीपक घोरपडे व अरविंद पाटील यांनी केली. पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहे.
No comments: