भित्तीपत्रिके विद्यार्थ्यांना सर्जनशील बनवतात.
भित्तीपत्रिके विद्यार्थ्यांना सर्जनशील बनवतात.
-------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------
भित्तिपत्रक विद्यार्थ्यांना सर्जनशील बनवतात असे प्रतिपादन मंडल अधिकारी मा. सचिन हाके यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे 'विजया 'वार्षिक अंकाच्या संपादकीय मंडळांनी आयोजित केलेल्या "पाऊसधारा" या विषयावरील भित्तीपत्रिकांचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी हा भविष्यामध्ये मोठा लेखक ,थोर कलाकार ,प्रतिभावंत कवी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, त्यांच्या प्रयत्नांना दिशा व आकार देणे, त्यांच्या पहिल्या वाहिल्या प्रयत्नांचे गोड कौतुक करणे हे तुम्हा-आम्हा सर्वांचेच कर्तव्य आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.शिवाजीराव होडगे आपल्या मनोगतात म्हणाले की, 'विजया' वार्षिक अंकाची प्रत्येक वर्षी महाविद्यालयात निर्मिती केली जाते. उदयोन्मुख लेखकांना, कलावंतांना विविध लेख, कथा, कविता ,चित्रकला इत्यादीच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देण्यासाठी 'विजया'वार्षिक अंक महत्वाची भूमिका बजावत असतो. यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव दिला जातो. या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य डॉ. एस .बी. पोवार सर तसेच मा. श्री किरण चौगुले सर (समन्वयक बार्टी ),मा.श्री निलेश पोवार सर (समन्वयक सारथी ),मा श्रीमती संगीता चौगुले (ग्राम महसूल अधिकारी तलाठी )इत्यादी होते कार्यक्रमाचे स्वागत गौरी परीट हिने केले. तर प्रास्ताविकामध्ये विजया वार्षिक अंकाचे मुख्य संपादक लेफ्टनंट प्रा.विनोद प्रधान सरांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आभार प्रदर्शन राणी गुरव हिने व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी प्रा. दादासाहेब सरदेसाई सर,डॉ.अशोक पाटील,प्रा सुहास गोरुले,प्रा.आर. डी.पाटील ,प्रा.मनीषा पाटील, प्रा. स्वप्निल मेंडके ,प्रा. राहुल बोटे आणि इतर प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment