Header Ads

कुंभोज येथे नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

 कुंभोज येथे नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी.


----------------------------------

 कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

----------------------------------

कुंभोज येथे नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी हनुमान मंदीरात श्रद्धा व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास गावातील नाभिक समाजबांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.


कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराजांच्या पुतळा पूजन व अभिषेकाने करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनातून संत सेने महाराजांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत त्यांच्या समाजप्रबोधन व भक्तीपर कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व सामाजातील कार्यकर्ते तसेच शिवा काशीद तरुण मंडळाचे कार्यकर्ते स्थानिक कीर्तनकार उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून संत सेने महाराजांच्या कार्याचे स्मरण करून, नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.


कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सर्व समाजबांधवांनी सहभागी होऊन सामूहिक भोजनाचा लाभ घेतला.विनोद शिंगे कुंभोज

No comments:

Powered by Blogger.