कागलमध्ये दूधगंगा नदीला पूर; राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता.
कागलमध्ये दूधगंगा नदीला पूर; राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता.
-------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
-------------------------------------
कागल : कागल तालुक्यातून वाहणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, शुक्रवारी सकाळी कागल येथील मयूर धाबा समोरील राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले. पावसाची रिपरिप सुरू असली तरी, नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीची पातळी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून सुळकुट आणि करनूर ओढ्यांनाही पूर आला आहे. यामुळे कागलमधील आरटीओ चेक पोस्टच्या कंपाऊंडमध्येही पाणी शिरले आहे.
जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. सध्या पाऊस कमी झाल्यास पाणी पातळी पुन्हा सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment