कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक भांडवलकर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल स्वातंत्र्यदिनी पालकमंत्राच्यां हस्ते गौरव.
कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक भांडवलकर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल स्वातंत्र्यदिनी पालकमंत्राच्यां हस्ते गौरव.
----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------
कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांच्या टीमने बनावट नोटांचा तपास योग्यता पुर्वक करून न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल केले. न्यायालयाने सर्व आरोपी दोषी ठरवून चार वर्षे सहा महिने शिक्षा ठोठावण्यात आली. सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी बनावट नोटा तपास करून योग्य दिशा देऊन महत्वपूर्ण भूमिका बजावली या कार्याबद्दल 79 व्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी जिल्हा अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा अधिकारी अशोक काकडे ,जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे ,जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारस्कर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमुसे अधिसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment