राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विदयार्थी विजयी.

 राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विदयार्थी विजयी.

कोल्हापूर – १४ ऑगस्ट २०२५ रोजी हौसाबाई जयपाल मगदूम पब्लिक स्कूल व सहोदय कॉम्प्लेक्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच स्व. डॉ. जे.जे. मगदूम यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन विभागात विजेतेपद पटकावले.


राज्यभरातील एकूण २८ सीबीएसई शाळांनी या वादविवाद स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा गट अ (इ. ५ वी-६ वी), गट ब (इ. ७ वी-८ वी) आणि गट क (इ. ९ वी-१० वी) या तीन गटांमध्ये चार फेऱ्यांत पार पडल्या. गट अ मध्ये आरवी सौरभ मंत्री व रुही अरुण भंडारी (दोघीही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ) यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाची ट्रॉफी व रोख रक्कम पारितोषिक जिंकले. 

     तर गट ब मध्ये मोहम्मद अझलान बाशा व शर्वी चिंतामणी खरे (दोघेही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ) द्वितीय क्रमांक पटकावून ट्रॉफी व रोख रक्कम पारितोषिक प्राप्त केले.

या यशामागे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्यासोबतच त्यांची मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.  या यशाबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य श्री अस्कर अली यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका निशा शर्मा व अदिती बॅनर्जी यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.