कुंभोज ग्रामपंचायतीकडून दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
कुंभोज ग्रामपंचायतीकडून दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
कुंभोज (ता. हातकणंगले) : कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.जयश्री महापुरे होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच आप्पासाहेब पाटील ग्रामसेवक सुषमा कांबळे,किरण माळी, शालेय मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य, पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि शाळेच्या प्रोत्साहनात्मक वातावरणाला दिले.
किरण माळी व विनोद शिंगे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. "गावाचा नावलौकिक वाढवणारे हे विद्यार्थी भविष्यात समाजाचे नेतृत्व करतील," असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले तर आभारप्रदर्शन पत्रकार विनोद शिंगे यांनी मानले.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment