एकोंडी फार्महाऊसवर पोलिसांचा छापा; रंगेल पार्टीचा पर्दाफाश.
एकोंडी फार्महाऊसवर पोलिसांचा छापा; रंगेल पार्टीचा पर्दाफाश.
------------------------------
सलीम शेख
-------------------------------
कागल : तालुक्यातील एकोंडी येथील व्हन्नूर परिसरात असलेल्या चौगुले फार्महाऊसवर २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कागल पोलिसांनी छापा टाकत एका ‘रंगेल पार्टी’चा पर्दाफाश केला. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे, अश्लील गाण्यांवर बिभत्स नृत्य करणे आणि विनापरवाना मद्यपान करणे या आरोपांखाली पोलिसांनी तीन महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीत बार्शी तालुक्यातील विजय कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, नितीन आवटे, सचिन कुडे यांच्यासह कागल, कोल्हापूर आणि हुपरी येथील तीन महिला तसेच फार्महाऊसचा मालक कृष्णा चौगुले यांचा समावेश होता.
छाप्यादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मद्य आणि इतर साहित्यासह एकूण ७ लाख ७० हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत फार्महाऊसवर मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.
No comments: