गगनगिरी अर्बन क्रेडिट सोसायटीची उत्तुंग भरारी.
गगनगिरी अर्बन क्रेडिट सोसायटीची उत्तुंग भरारी.
----------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
9595316266
----------------------------------
कळे:-सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर अल्पावधीत नावा रुपाला आलेल्या गगनगिरी अर्बन क्रेडिट सोसायटीने उत्तुंग भरारी घेतली असून यापुढे ही गगनगिरी सोसायटी सभासदांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी केले.
फुलेवाडी रिंग रोड येथील संस्थेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री विलास पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा सांगितला. तसेच सभासदासाठी संस्था असून सभासदांनी संस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मानसिंगराव चौगले होते. यावेळी
किरवे तालुका गगनबावडा येथील सरपंच संजय पाटील यांनी संस्था वाढवण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
गगनगिरी महाराजांचे निष्शिम भक्त आणि सामाजिक कार्यकर्ते मा. सरपंच नंदकुमार पवार गगनबावडा यांनी संस्था ही भविष्यातील तरुणांना मदत करणारी जीवनदायी असेल असे सांगितले.
यावेळी संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच संदीप पाटील .सुभाष भिके. अविनाश पाटील. संतोष पाटील. सरदार खाडे .मानसिंग सातपुते. प्रकाश पाटील. कोदे सरपंच शोभा पाटील. विजय चव्हाण .गगनबावडा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश पाटील तानाजी जाधव प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मॅनेजर चंद्रकांत कातळे यांनी तर आभार जनरल मॅनेजर अनिल पाटील यांनी मानले.
कोल्हापूर विभाग
Comments
Post a Comment