बाजार भोगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न.
बाजार भोगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न.
------------------------------
बाजार भोगाव
सुदर्शन पाटील
------------------------------
बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करावे, गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनक्षेत्र हद्दीवर जाळी मारून शेती व शेतकरी वाचवा, मे महिन्यात मान्सूनपुर्व पाऊसमुळे झालेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले त्याची भरपाई मिळवी असे ठराव बाजारभोगाव (ता पन्हाळा) येथील ग्रामसभेत करण्यात आले
बाजारभोगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहाने पार पडली. सरपंच सीमा हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण यांच्या उपस्थित झाली.
बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रूग्णालयात करावे असा ठराव नितीन हिर्डेकर यानी मांडला यामुळे पश्चिम पन्हाळा व दक्षिण शाहूवाडी तालुक्यातील तीस गावे शंभर वाड्यावस्त्यांना फायदा होणार असल्यामुळे या ठरावास ग्रामस्थांनी पाठिंबा दिला हा ठराव ग्रामपंचायतीने करावा असा ठराव करावा अशी मागणी नितीन हिर्डेकर केली. सदर ठराव पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रशासनास देण्याचे ग्रामसभेत ठरले.
मान्सूनपुर्व पाऊसामुळे झालेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले त्याची भरपाई मिळवी असा ठराव पन्हाळा कॉग्रेस चे तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर यानी केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष बळीराम पाटील यानी वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनक्षेत्र हद्दीवर जाळी मारावी ठराव करण्याची मागणी केली. तर बाजारभोगाव पैकी मोताईवाडी येथील डोंगरावरील सपाटीकरण व बांधकाम थांबवले नाहीतर मोताईवाडी ची माळीण होईल त्यामुळे ग्रामपंचायतीने तहसिलदार यांच्याकडे याबाबत निवेदन द्यावे अशी मागणी खंडू बने यांनी केली. पांनद नोंद करून रूंदीकरण करून रस्ता करणे नवीन रोजगार सेवक नेमावा, तसेच घरे नोंद करणे आदी विषयावर चर्चा झाली. सरपंच सीमा हिर्डेकर सदस्य. युवराज पाटील ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण यानी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत तर कृष्णात खोत, रघुनाथ वाळवेकर विश्वास पाटील भगवान पाटील यानी विविध विषयावर झालेल्या चर्चेत भाग घेतला.
या ग्रामसभेस उपसरपंच सुवर्णा खोत ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील अमर धनवडे, रंजना शिंदे, प्रशांत इंगळे महासूल सेवक चंदू म्हसवेकर पोलिसपाटील छाया पोवार यांच्यासह नितीन हिर्डेकर प्रभाकर कामेरकर , विश्वास पाटील, जयसिंग हिर्डेकर बळीराम पाटील, पांडुरंग पाटील तानाजी कुंभार, खंडू पाटील हरिचंद्र हिर्डेकर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते आभार क्लार्क संदीप पाटील यानी मानले
फोटोओळ - बाजारभोगाव ग्रामसभेत बोलताना सरपंच सीमा हिर्डेकर तसेच उपस्थित सदस्य व मान्यवर
Comments
Post a Comment