वाठार लॉजमध्ये पुण्याच्या युवकाचा मृतदेह आढळला.
वाठार लॉजमध्ये पुण्याच्या युवकाचा मृतदेह आढळला.
अंबप : वाठार (ता. हातकणंगले) येथील एका लॉजमध्ये पुण्याचे संतोष अरुण देशमुख (वय 47, रा. कोथरूड, पुणे) यांचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संतोष देशमुख व त्यांचे सहकारी मदन प्रभाकर गानगोटे (वय 55, रा. माळवाडी, पुणे) हे दोघे वाठार येथे एका लॉजमध्ये राहण्यासाठी आले होते. त्यांनी आधारकार्ड दाखवून चार दिवस राहणार असल्याचे सांगितले. संतोष देशमुख हे आजारी असल्याची व दोघेही कामाच्या शोधात असल्याची माहिती लॉज व्यवस्थापनास दिली होती.
दरम्यान, गानगोटे रोज सकाळी बाहेर जात व सायंकाळी परतत होते, तर देशमुख खोलीतच राहत होते. चार दिवसांनी रूम साफसफाईसाठी गेल्यानंतर दुर्गंधी जाणवल्याने संशय निर्माण झाला. आज सकाळी नऊच्या सुमारास गानगोटे यांनी पेठ वडगाव पोलिसांना देशमुख मृत्यू झाल्याची माहिती दिली.
संतोष देशमुख यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगी तसेच भाऊ-बहीण असा परिवार आहे.
No comments: