जयवंतराव पाटील फाउंडेशन संस्था समूहाच्या वतीने शिवकालीन बाराबंदी पोषाक भेट ववृक्षारोपण फळे वाटपाचा कार्यक्रम.

 जयवंतराव पाटील फाउंडेशन संस्था समूहाच्या वतीने शिवकालीन बाराबंदी पोषाक भेट ववृक्षारोपण  फळे वाटपाचा कार्यक्रम.

-------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-------------------------------- 

 करवीर  तालुक्यातील कुरुकली येथील कै.जयवंतराव पाटील यांच्या २९व्या पुण्यतिथी निमित्त कै.जयवंतराव पाटील फौंडेशन संस्था समुहाच्या वतीने केंद्र शाळेत वृक्षारोपण फळेवाटप तसे शिवकालीन बाराबंदी पोषाख भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

     प्रारंभी जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन भोगावतीच्या माजी संचालिका तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कै.जयवंतराव पाटील यांच्या २९व्या पुण्यतिथी निमित्त केंद्र शाळा कुरुकली येथे पाटील परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना अल्पोपहार फळे वाटप करण्यात आली. तसेच वीर हनुमान शिवकालीन मर्दानी आखाड्यास शिवकालीन बाराबंदी पोशाख भेट देण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी न्यायधिश सायली पाटील यांनी विद्यार्थीनी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेऊन भविष्यात यशाचे शिखर गाठायचे असते असे सांगितले. डॉ.दिग्विजय पाटील म्हणाले, माझे चुलते कै.जयवंतराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून चालू ठेवला असल्याचे सांगितले. 


    यावेळी मुख्याध्यापक सुरेश कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य ऋतुराज पाटील किरण पाटील सुनिल पाटील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरज पाटील यांनी जयवंतराव पाटील फौंडेशन च्या वतीने दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास उपसरपंच दिपाली पाटील ग्रामपंचायत सदस्य राजाराम पाटील जयवंतराव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल पाटील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील डी.एन.पाटील श्रीनिवास पाटील अशोक पाटील रघुनाथ पाटील विठ्ठल भुईगंडे वसंत पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कूष्णात कोईगडे उपाध्यक्ष अलका पाटील ऋतुराज पाटील प्रतिक पाटील रोहीत रघुनाथ पाटील शिवाजी बामणे शारदा कोईगडे नामदेव पाटील राजाराम पाटील किरण पाटील अंकुश पाटील किरण पाटील राहुल पाटील आदी जयवंतराव पाटील संस्थेचे पदाधिकारी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.