गोकुळ शिरगावमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था: नागरिकांचा संताप उफाळला.
गोकुळ शिरगावमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था: नागरिकांचा संताप उफाळला.
-----------------------------
गोकुळ शिरगाव
संस्कार कुंभार
-----------------------------
: गोकुळ शिरगाव येथील साईप्रसाद हॉटेलसमोरील सर्विस रोड अक्षरशः चाळण झाल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रस्त्यावर दीड ते दोन फूट खोल खड्डे पडल्यामुळे अनेक वाहनांचे शॉकअप्स आणि रीम्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
औद्योगिक वसाहतीचा महत्त्वाचा मार्ग धोक्यात आहे.गोकुळ शिरगाव ही औद्योगिक वसाहत असल्याने या मार्गाचा वापर कामगार, उद्योजक आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. दिवसा वाहतुकीचा ओघ असतोच, पण रात्रीच्या वेळी अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत. काही वाहनधारक खड्ड्यांमध्ये पडल्याने जखमी झाल्याचेही वृत्त आहे.या समस्येमुळे स्थानिक नागरिक, वाहनधारक, हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक यांचा रोष वाढत असून त्यांनी औद्योगिक वसाहत प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. "रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबू," असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अशी मागणी स्थानिक नागरिकांनी करत आहेत.स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment