महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षपदी नारायणराव शिंगटे यांची फेरनिवड.
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षपदी नारायणराव शिंगटे यांची फेरनिवड.
-------------------------------
सातारा प्रतिनिधी
शेखर जाधव
-------------------------------
सातारा,जावली - मेढा येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सभा दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाली यावेळी कार्याध्यक्षपदी श्री नारायणराव शिंगटे गुरुजी यांची फेरनिवड करण्यात आली
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या निर्मितीपासून वाचन चळवळीमध्ये सहभाग घेऊन वाचनालयात संचालक , सचिव ,सल्लागार आदी विविध पदे स्वीकारून वाचनालयाच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मेढा ग्रामपंचायतीकडून या वाचनालयाच्या इमारतीसाठी जागा मिळवणे कामी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून सौ विजया थत्ते यांचे सभागृहासाठी निधी गोळा करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
या फेर निवडीबद्दल ग्रामस्थ मंडळ मेढा भैरवनाथ युवा क्रीडा मंडळ मेढा , व्यायाम मंडळ मेढा , हितचिंतक ,वाचक वर्ग, सहकारी संचालक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment