गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे" जीवन गौरव पुरस्कार" श्री रघुवीर आपटे श्री दिलीप चरेगावकर श्री गोपाळ खजुरे यांना जाहीर.

 गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे" जीवन गौरव पुरस्कार" श्री रघुवीर आपटे  श्री दिलीप चरेगावकर  श्री गोपाळ खजुरे यांना जाहीर.

--------------------------------

सातारा,जावली 

शेखर जाधव

--------------------------------

गुणवंत कामगार प्रतिष्ठान साताराचे संस्थापक श्री रघुवीर आपटे ,श्री दिलीप चरेगावकर, श्री गोपाळराव खजुरे यांनी प्रतिष्ठानचे स्थापनेपासून प्रतिष्ठानचे वाटचालीत दिलेल्या योगदानाबद्दल तसेच त्यांनी सामाजिक कार्यात गेल्या चार दशकापासून अधिक वर्ष केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना प्रतिष्ठानचे वतीने कृतज्ञतापूर्वक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून  त्यांचे सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

             सदर कार्यक्रमाचे अतिथी म्हणून माननीय नामदार श्री मकरंद आबा पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य), विशेष अतिथी म्हणून माननीय श्री सुरेश केसरकर (संस्थापक अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व माजी सदस्य महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई) व माननीय श्री नितीन देशपांडे सो (मुख्य मानव संसाधन अधिकारी कूपर कार्पोरेशन सातारा) हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत

          सदरचा कार्यक्रम रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी समर्थ सदन सातारा येथे संपन्न होणार आहे तरी सदरचे जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभासाठी सातारकर नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गौरव समितीचे अध्यक्ष श्री अशोकराव जाधव सचिव श्री गजानन घाडगे उपाध्यक्ष श्री इकबाल काझी आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जयंत देशपांडे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.