गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभोज येथे पोलिसांचा रूट मार्च.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभोज येथे पोलिसांचा रूट मार्च.
-----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------------
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता अबाधित राहावी,तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हातकणंगले पोलीस दलाच्या वतीने कुंभोज येथे रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यांचे अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड, तसेच एसआरपी पथक या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
रूट मार्चची सुरुवात ग्रामपंचायत येथून करण्यात आली.त्यानंतर दिपक चौक,बँक चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौक मार्गे रूट मार्च आंबेडकर चौकापर्यंत नेण्यात आला. या रूट मार्चमध्ये सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कुंभोज गावात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध मंडळांकडून भव्य मूर्तींची स्थापना केली जाते.काही ठिकाणी गणपतींचे आगमनही पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मोठ्या जल्लोषात झाले आहे.मंडळांनी आपापल्या गणेशमूर्तींच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.येणाऱ्या सण उत्सवांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकणंगले पोलीस दल सतर्क आहे.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment