मुंबई : आ. रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत बेडर समाजाच्या प्रश्नाबाबत चर्चा करताना सदाशिव नाईक व पदाधिकारी बेडर आणि बेरड समाजाचा प्रश्न सोडवणार.
मुंबई : आ. रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत बेडर समाजाच्या प्रश्नाबाबत चर्चा करताना सदाशिव नाईक व पदाधिकारी बेडर आणि बेरड समाजाचा प्रश्न सोडवणार.
---------------------------
सातारा प्रतिनिधी
---------------------------
आ. रविंद्र चव्हाण; मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याच्या आश्वासन
) - महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभाग या दोन्ही विभागाचा बेडर आणि बेरड समाज एकच आहे, या संदर्भात दोन्ही विभाग सकारात्मक दृष्टीने अभ्यास सुरू आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मुंबई येथे मंत्रालय मध्ये बैठक लावण्याच्या आश्वासन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या मुंबई येथेल निवासस्थानी दिले.
बेडर आणि बेरड ही जात महाराष्ट्रात एकच असून या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असल्याने या दोन्ही शब्दांची दुरुस्त करुन बेडर शब्द मान्य करत अनुसूचित जातीचा दाखला मिळावा, अशी मागणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनजाती बेडर बेरड समाज उत्थान समितीचे अध्यक्ष सदाशिव नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत शिष्टमंडळात शंकर नाईक, संजय नाईक, मारुती नाईक, मल्लाप्पा नाईक, उपस्थित होते.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाला याबाबत रीतसर लेखी पत्र दिले असून त्याबाबत या विभागाने कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याबाबत ठोस कार्यवाही झाली नसल्याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामार्फत समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती सदाशिव नाईक यांनी आ. रवींद्र चव्हाण यांना केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जात उल्लेखाचा प्रश्न सुटण्यासाठी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावण्याचा आश्वासन दिले असून यामुळे लवकरच बेडर, बेरड समाजाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास सदाशिव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment