जयसिंगपूरमध्ये रुग्णांची लूट – फक्त ८ टाके घालण्यासाठी तब्बल २३,५०० रुपयांचे बिल.
जयसिंगपूरमध्ये रुग्णांची लूट – फक्त ८ टाके घालण्यासाठी तब्बल २३,५०० रुपयांचे बिल.
------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
------------------------------------
जयसिंगपूरमध्ये रुग्णांची लूट – फक्त ८ टाके घालण्यासाठी तब्बल २३,५०० रुपयांचे बिल.
जयसिंगपूर : सर्वसामान्य रुग्णांची वैद्यकीय क्षेत्रातून होत असलेली सर्रास लूट अजूनही थांबलेली नाही. नुकतीच जयसिंगपूर शहरातील पायोस हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका रुग्णावर केवळ ८ टाके घालण्यात आले. परंतु, रुग्णालय प्रशासनाने बारा तासांच्या आत तब्बल ₹२३,५०० चे बिल वसूल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट जिल्हाध्यक्ष गड किल्ले संवर्धन प्रमुख राहुल मोरे यांनी हा प्रकार उघड करत संताप व्यक्त केला.
“फक्त टाके घालण्यासाठी एवढा खर्च होतो का? मनमानी बिल लावून सर्वसामान्यांची लूट केली जाते. सेवा भावना संपुष्टात येऊन रुग्णालये केवळ कमाईचे साधन बनली आहेत. या विषयावर सरकारने लक्ष घालून लूट थांबवावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक लोकांचा सवाल असा की, “८ टाक्यांसाठी २३,५०० रुपये? – ही सेवा की लूट?”
या संदर्भात संबंधित विभागाने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Comments
Post a Comment