हौसेला मोल नाही! वेतवडेत पाटील कुटूंबियाच्या घरी गाईची ओटी भरणी कार्यक्रम.
हौसेला मोल नाही! वेतवडेत पाटील कुटूंबियाच्या घरी गाईची ओटी भरणी कार्यक्रम.
कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या गायीचे असेल तर..! पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका कुटुंबाने आपल्या लाडाच्या देशी गायीचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
कुणावर किती प्रेम असेल, तसे सांगणे अवघड आहे. कारण पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका गाय प्रेमीने आपल्या गाईचे चक्क डोहाळे जेवण घातले. हे डोहाळे जेवण काही साधं-सुधा नव्हतं. तर अगदी झकास होते. गाईला सजवण्यापासून मेजवानीसाठी पंचपक्वान्नांची सोय ,आहेर-माहेर असे सर्व काही करण्यात आले. हा सोहळा अगदी एखाद्या सुवासिनीच्या ओटीभरणीपेक्षाही दिमाखदार होता.
धामणी खोऱ्यातील वेतवडे ता पन्हाळा गावचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी शिवाजी राणोजी पाटील यांची देशी गोमाता पहिल्यांदा गाबन राहिली तिचा सातवा महिना असल्याने पाटील कुटुंबातील सर्वांनी ठरवले की आपण गोमातेचे ओटी भरणे (डोहाळे जेवन) घालू आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी गावांतील सुहासिनी महिलांना बोलावून ओठी भरण्याचा कार्यक्रम केला.सुवासिनींना रुचकर अन्नाचे पोटभर जेवण दिले.
गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आता ही प्रथा प्राण्यांच्या बाबतीत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील पार पडलेले, एका गायीचे डोहाळे जेवण सध्या गावात चर्चेचा विषय बनला आहे. पाटील कुटुंबाचे त्यांच्याकडे असणार्या म्हैशी गाईंवर जीवापाड प्रेम आहे. शिवाजी पाटील यांचे तर गायीवर खुप प्रेम आहे. अगदी तिच्या आंघोळीपासून सर्व गोष्टींची काळजी पाटील कुटुंब स्वतः घेतात.डोहाळे घालून उपस्थितांना जेवन, गाईचे औक्षण आणि सर्व विधी देखील अगदी दिमाखात पार पडले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात गावातील काही सुहासिनींची उपस्थिती होती. खरं तर असं म्हणतात की हौसेला मोल नसते. शिवाजी पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम त्याचे उदाहरण म्हणावे लागेल.
No comments: