Header Ads

कागल येथे होमगार्ड जवानाचा मृत्यू.

 कागल येथे होमगार्ड जवानाचा मृत्यू.

 --------------------------------

सलीम शेख 

--------------------------------

कागल :  श्री गणेश उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. या उत्सव काळात कागल शहरांमध्ये गस्त घालत असताना  चक्कर येऊन पडल्याने होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला. अविनाश चंद्रकांत पाटील वय वर्षे 38 राहणार शाहूनगर, बेघर वसाहत ,कागल. असे मयत जवानाचे नाव आहे.

             या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झालीआहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड अविनाश पाटील हा गणपती उत्सवाच्या निमित्ताने कागल शहरांमध्ये गस्त घालत होता .सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर आली. त्यामुळे त्यास कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तो अविवाहित आहे. सन2007 पासून गृहरक्षक दलात तो काम करीत आहे. त्याच्या पश्चात आई आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार कोचरगी हे करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.