मराठा आरक्षण प्रश्नी कागलमध्ये एक दिवसीय ठिय्या आंदोलन.
मराठा आरक्षण प्रश्नी कागलमध्ये एक दिवसीय ठिय्या आंदोलन.
-----------------------------
सलीम शेख
-----------------------------
कागल: मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मध्ये कालपासून उपोषण सुरू केले आहे , या उपोषणाला पाठिंबा म्हणून कागल तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन कागल येथील बसस्टँड परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे केले.
या आंदोलनात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने , कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर , नितीन दिंडे , नितीन काळबर , संजय चितारी , नाना बरकाळे , सौरभ पाटील , संग्राम लाड , प्रवीण काळबर , जेष्ठ नागरिक शामराव पाटील,हिदायत नायकवाडी , कासिम मुल्ला, बाबासाहेब काझी, सुलतान काझी यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते
यावेळी भैया माने यांनी मराठा आरक्षण ही काळाची गरज असून आरक्षणाची मागणी लावून धरली यांच्यासह उपस्थित मान्यवरानी आरक्षण प्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या
कागल मधील मुस्लिम समाजाने आंदोलन स्थळी येत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा दिला , यावेळी बोलताना समीर नायकवडी यांनी मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ असून आम्ही कायम लहान भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी असून प्रसंगी मुंबई ला धडक मारू अशी ग्वाही दिली.
कागलमध्ये विविध स्तरातून या आंदोलनास पाठिंबा मिळाला
यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते
No comments: