फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टवरून वाद:कागल पोलिसांकडे केली तक्रार.
फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टवरून वाद:कागल पोलिसांकडे केली तक्रार.
---------------------------------------
कागल प्रतिनिधी
सलीम शेख
---------------------------------------
कागल: सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारी आणि मुस्लिमांच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन च्या कागल शाखेने कागल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या पोस्टमुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कागल येथील सर्जेराव पाटील नावाच्या व्यक्तीने फेसबुकवरून अल्लाहबाबत अपमानास्पद आणि चित्रीकरण केलेली एक पोस्ट व्हायरल केली. या पोस्टमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, समाजात द्वेष आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.समस्त मुस्लीम समाजावतीने कागल पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात, या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही तर पक्ष आणि मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या तक्रारीसोबत आक्षेपार्ह पोस्टचा पुरावा म्हणून एक प्रतही जोडण्यात आली आहे. कागल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment