मिरज रेल्वे स्थानकावर वादातून एकाचा मृत्यू; लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू.
मिरज रेल्वे स्थानकावर वादातून एकाचा मृत्यू; लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू.
--------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------------
मिरज: मिरज रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सोमवारी रात्री दोन व्यक्तींमधील वादामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव सतीश मोहिते (वय ३२, रा. कोल्हापूर) असे असून, लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सतीश मोहिते हे मिरज रेल्वे स्थानक परिसरात भंगार गोळा करून तिथेच राहत होते. सोमवारी रात्री अंदाजे नऊच्या सुमारास त्यांचा दुसऱ्या एका व्यक्तीसोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेला असता झालेल्या झटापटीत सतीश मोहिते हे प्लॅटफॉर्मवर पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. मिरज लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Comments
Post a Comment